प्रभागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि शिवसेना शाखा, साठेनगर (आंबेडकर चौक) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वह्यांचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. त्यांच्यासोबत स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याच्या वाटपामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळाले असून, पालकांचा आर्थिक भारही कमी झाला.
अशा प्रकारचे उपक्रम शिक्षणाला चालना देतात आणि समाजातील प्रत्येक मुलाला समान संधी उपलब्ध करून देतात.